घरासाठी फसवणूक करणाऱ्यास आठ वर्षांनंतर अटक

1657

गिरीश भोपी, प्रतिनिधी क्राईम न्यूज :-    

स्वस्तात घर देतो , म्हणून एंजटकडून फसवणुकीचे प्रकार वारंवार समोर येत आहेत ‘अशीच आठ वर्षां पूर्वी घर व दुकानासाठी गाळा देतो म्हणून एकाची फसवणूक करणाऱ्यास नवी मुबई पोलिसानी अटक केली आहे आरोपीला ९फेब्रुवारीपर्यंत  पोलीस कोठडी देण्यात आली आहे .     

         संजय सुतार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आसाम येथील मूळ रहिवाशी असलेले प्रशांत गोसावी खारघर येथे नोकरीनिमित्त आले होते . घर आणि व्यवसायासाठी गाळा घेण्यासाठी चौकशी करत असताना संजय सुतार हा एजंट त्यांच्या संपर्कात आला. सुतार याने प्रशांत याचा विश्वास संपादन करून खारघर सेक्टर ५ येथिल एक निर्माणाधिंन इमारत दाखवून त्यात एक सदनिका आणि एक गाळा असे एकूण ६० लाखात मिळू शकेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्याला भुलून  प्रशांत यांनी काही महिन्यात  ४५ लाखाची  रक्कम दिली. यानंतर सुुतार याने प्रशांत यांच्याशी असलेला संपर्क तोडला. वारंवार फोन करून देखील संपर्क करून देखील त्याने फोन घेण्यास टाळाटाळ करू लागला.अनेक दिवस मागे लागूनही सदनिका व गाळा सुतार याने दिलाच नाही . तर काही दिवसात तो खारघर येथून पळून गेला .
आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच प्रशांत यांनी 
सप्टेंबर २०११ मद्ये खारघर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा नोंद केला. यानंतर खारघर पोलीस व नवी मुंबईचे पोलीस त्याच्या मागावर होते.पण तो पोलिसांना चकवा देत होता. मागील आठवड्यात सुतार बाबत गुणेशाखा युनीट दोनचे  पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेर यांना त्याच्या 
बाबतीत खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरिक्षक पोपेर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद ढोले  यांना सुचना देऊन त्यांच्या  नेतूत्त्वाखाली हवालदार सुनील धनगुडे, पद्मसिह पवार, संजय पगारे याचे पथक नेमून त्याला सुतार राहात असलेल्या पेण येथील घराशेजारी सापळा लावला . दिवसभर सापळा लावला. पण दिवसभर सापळा लावून देखील आरोपी तेथे आला नाही. पण मिळालेली माहिती खरी असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद ढोले यांनी काहीही करून आरोपीला अटक करणारच असा चंग बांधला होता.
अखेर रात्री नऊच्या सुमारास आरोपी तेथे दाखल झाला. पोलिसांनी आरोपी तोच असल्याची खात्री करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला नऊ ९ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आरोपीला आठ वर्षांनी अटक केल्याने नवी मुंबई पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.