Thursday, March 20, 2025
Google search engine
HomeMalhar Newsकरोडो रुपयांच्या नकली नोटा जप्त

करोडो रुपयांच्या नकली नोटा जप्त

शैलेंद्र चौधरी,नंदुरबार

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोराखेडी पोलिसांनी बुलढाणा रोड वरील ग्राम मोहेंगाव येथील आश्रम शाळे मागील शेतातून करोडो रुपयाच्या नकली नोटांनी भरलेल्या बॅगे सह एकाला अटक केली आहे तर सोबत असलेले आरोपी घटनास्थळा वरून फरार झाले आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की, बोराखेडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोताळा तालुक्यातील ग्राम मोहेंगाव येथील आश्रमशाळे मागील शेतात मध्ये करोडो रुपयाच्या नकली नोटा असलेल्या युवकाला बोराखेडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घटनास्थळा वरून काही आरोपीं फरार झाले असुन पोलिसांच्या वतीने त्यांचा शोध घेण्यात येत आहे आश्रम शाळेच्या पाठीमागील शेतात मधून एका आरोपी सह पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काळ्या रंगाचा बॅॅग मधून पोलिसांनी करोडो रुपये ताब्यात घेतले आहे ताब्यात घेतलेल्या करोडो रुपयांच्या नोटा पैकी नोटांच्या प्रत्येक गड्डी ला पहिली नोट ही ओरीजनल (खरी) लावलेली आहे तर बाकीच्या सर्व नोटा ह्या नकली आहेत सदरची कारवाई ही पो हे कॉ तय्यब अली व पो कॉ सुनील भवटे यांनी पार पडली असुन सदरच्या नकली नोटांचे मोजमाप हे रात्री उशिरापर्यंत स्थानिक ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी असलेल्या दोन पंचा समोर सुरू होती सदरच्या प्रकरणात बोराखेडी पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येत असुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!