अनिल चौधरी,पुणे:-
महाराष्ट्राची लावणीची परंपरा जिवंत ठेवत, युवा पिढीला या पूर्वापार चालत आलेल्या लोकप्रिय नृत्याची ओळख करून देण्यासाठी झी युवा वाहिनीने ‘अप्सरा आली’ हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणला. त्यांनतर प्रत्येक बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता अक्खा महाराष्ट्र केवळ अप्सरा आली हा कार्यक्रम पाहण्यात मश्गुल झाला . लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध लोकनृत्य’लावणी’ला मंच उपलब्ध करून देणाऱ्या अप्सरा आली या कार्यक्रमात आजपर्यंत अनेक सौंदर्यवती आणि उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या अप्सरांनी त्यांची कला सादर केली. महाराष्ट्रातूनच नव्हे तर सातासमुद्रापलीकडून त्यात भाषा आणिदोन देशांमधील अंतर याचा अडथळा पार करत क्लॉडिया आणि लीटा कोलंबिया देशातून या कार्यक्रमात सहभागी झाल्या. सध्या श्वेता परदेशी, ऋतुजा राणे, माधुरी पवार, मानसी शर्मा, ऐश्वर्या काळे , श्रुती भालेकर , पायल मेमाणेआणि किन्नरी दामा या अप्सरा सध्या या कार्यक्रमात आपली कला सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत . मात्र आता ही स्पर्धा त्याच्या अंतिम टप्प्यावर आली असून येत्या बुधवारी उपांत्यफेरी मध्ये या टॉप ८ स्पर्धकांमधूनटॉप ५ ची निवड होणार आहे. अप्सरा आली या कार्यक्रमाची हवा महाराष्ट्रभर असून प्रत्येक अप्सरा ही तिचा उत्तम परफॉर्मन्स देत आहे. आता या टॉप ५ अप्सरा कोण असतील याची साऱ्या महाराष्ट्राला आतुरता लागली आहेआणि हे जाणून घ्यायचं असेल तर बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता अप्सरा आली हा कार्यक्रम पाहावाच लागेल. झी युवा वाहिनीवरील सर्व कार्यक्रम बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ‘ झी फैमिली पॅक’ नक्की निवडा…या मध्ये तुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील.