मल्हार न्यूज प्रतिनिधी:-
शिवसेना कसबा मतदारसंघातील प्रभाग क्र १७ मधील तपकीर गल्ली शाखेचे उद्घाटन नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते व संघटक गजानन पंडित यांच्या उपस्थितीत पार पडले.तसेच या निमित्त २०० गरजू कुटुंबाना धान्यवाटप,वैद्यकीय मदत व औषधे वाटप,५१ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व शिष्यवृत्ती देण्यात आली,महिलांसाठी हळदीकुंकूचे आयोजन करत तुलसीचे रोपटे वाटप अनिता राठोड यांच्यातर्फे करण्यात आले.शाखाप्रमुख निलेश राऊत,निलेश ढवळे,योगेश खेंगरे,रविकिरण निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे मुख्य आयोजन केले होते.या प्रसंगी गजानन थरकुडे(पुणे शहर समन्वयक),अरविंद जैन,(व्यापारी आघाडी),गणेश शिंदे(विभागप्रमुख),प्रकाश दवे,चंद्रकांत वाघ,संजय खजिने,स्वातीताई कथलकर,सुलभाताई तळेकर,अनुपमा मांगडे आदी मान्यवर,पदाधिकारी,शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.