१मार्च रोजी हडपसरमध्ये साजरा होणार “रोटी डे”

945

आकाश जाधव, प्रतिनिधी, Malhar News

वर्षभर आपण वेगवेगळे ‘डे’ साजरे करून आनंदाची अनुभूती घेणाऱ्यांना हडपसरमधील टीम “रोटी डे”ने आणि तरुणाईने ‘रोटी डे’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे. अन्नदानाच्या प्रक्रियेला व्यापक स्वरूप देणारा हा१ मार्च रोजी हडपसरमध्ये मोठय़ा प्रमाणात केला जाणार असून या निमित्ताने हजारो गरजूंना, उपेक्षितांना एक वेळचे भोजन उपलब्ध होईल.
प्रेमाचा दिवस, मैत्रीचा दिवस, साडीचा दिवस, गुलाबांचा दिवस असे नानाविविध दिवस समाजात साजरे होत असतात. त्यात तरुण उत्साहाने सहभागी होत असतात. हे दिवस साजरा करणाऱ्या तरुणाईबरोबरच समाजातील सर्वांनीच  सामाजिक भान बाळगून एक दिवस दुसऱ्याला अन्न द्यावे अशी ‘रोटी डे’मागील कल्पना आहे. त्यातूनच १ मार्च हा ‘रोटी डे’ म्हणून करण्याच्या कल्पनेची आखणी झाली.
‘‘या उपक्रमात भाग घेणाऱ्यांनी आपल्या जवळच्या कोणत्याही  गरजूला रोटी म्हणजे पोळी किंवा भाकरी आणि भाजी किंवा चटणी वा जे शक्य असेल ते द्यावे. ज्या कोणाला अन्न द्यायचे आहे ते स्वेच्छेने द्यायचे आहे. त्यामुळे ते कोणाला द्यायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे. अन्न द्या एवढेच आवाहन करत आहोत, असे टीम रोटी डे ने केले आहे.. आपल्या जवळच्या अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात , फुथपाथ, वसतिगृहातील विध्यार्थी  यांच्याकडे जाऊन तेथे पोळी-भाजी देता येईल किंवा अन्यत्र दिसणाऱ्या गरजूंनाही पोळी-भाजी देता येईल, असेही आवाहन करण्यात आले आहे.