Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeमहाराष्ट्रवृक्ष तोडणाऱ्या विकासकावर वृक्ष प्राधिकरण नियमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करा : मनसे

वृक्ष तोडणाऱ्या विकासकावर वृक्ष प्राधिकरण नियमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करा : मनसे

गणेश शिंदें प्रतिनिधी, कामोठे/पनवेल

कामोठे ,पनवेल येथील एका विकासकाने  बेकायदेशीरपणे वृक्ष तोड केली होती.  याबाबत त्याच्यावर वृक्ष प्राधिकरण नियमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी पनवेल महानगरपालिके कडे केली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी कि, कामोठेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे पदाधिकारी यांनी अमृतवेल सोसायटी जवळ, सेक्टर ७, कामोठे येथील वृक्ष तोडी संदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्या संदर्भात पनवेल महानगरपालिकेतर्फे  दि. १०/०१/२०१९ व १४/०१/२०१९ रोजी जागेची पाहणी केली असता विकासकाकडून आपल्या स्वार्थापोटी वृक्षतोड करण्यात आली होती असे निदर्शनास आले. त्यासंदर्भात खुलासा करण्यासाठी त्या विकासकाला ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती तसे न केल्यास वृक्ष प्राधिकरण नियमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार होता परंतु तसे न करता त्या विकासकाला सुरक्षा अमानत रक्कम रु. ५००००/- आणि द्रव्यदंड म्हणून रु. ५०००/- असा दंड ठोठावण्यात आला. सिमेंटच्या जंगलात निष्पाप वृक्ष मोकळा श्वास घेत होते परंतु पैशांच्या जोरावर आपलं कोणी काही करू शकत नाही या प्रवृत्तीने  त्या निष्पाप झाडांचा खून करण्यात आला. अशा प्रकारे जर दंड थोपटवून पनवेल महानगरपालिका बाजू सावरासावर करत असेल तर या पुढे अशा प्रकारच्या घटना घडत राहतील. रहदारिस अडथळा येत होता असे खोटे कारण सांगत त्या विकासकाने तेथील झाडे तोडली परंतु प्रत्यक्ष पाहता हि सबब खोटी आहे असे दिसते. एकीकडे झाडांची तोड होऊ नये याकरिता नवीन पनवेल येथे आयुक्तांच्या हस्ते विद्युत दाहवाहिनीचे उदघाटन करण्यात येते तर दुसरीकडे आयुक्तांमार्फत विकासकाला फक्त दंड ठोठावण्यात आला. पनवेल महानगरपालिकेमार्फत धनाढय विकासकांना “झाडे तोडा, दंड भरा” असा संदेश देण्यात आला असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. भविष्यात असाप्रकार करताना विकासक विचार करतील या उद्देशाने त्या विकासकावर वृक्ष प्राधिकरण नियमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्याचे निवेदन मा. उपायुक्त सौ. संध्या बावनकुळे मॅडम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले. त्याप्रसंगी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण, कामोठे शहराध्यक्ष रोहित दुधवडकर, पनवेल शहराध्यक्ष शितल सिलकर, नवीन पनवेल शहराध्यक्ष पराग बालड, वाहतूक सेनेचे चिटणीस राहुल चव्हाण, महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष यतीन देशमुख, मनोज कोठारी, विशाल चौधरी, मिलिंद खाडे, संतोष सरगर, जयकुमार डिगोळे, आशितोष सोनावणे, अनिकेत मोहिते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!