गारमाळ शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप,

640

 दत्तात्रय शेडगे,खोपोली
जिल्हा परिषद शाळा येथील अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना दप्तर ,टिफीन, व वॉटर बॅग चे वाटप करण्यात आले,खोपोली येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे यांच्या मुलीचा काव्या हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद शाळा,गारमाळ येथील अंगणवाडी येथील अठरा विद्यार्थ्यांना दप्तर, वॉटर बॅग आणि टिफीन व खाऊचे वाटप वाटप करण्यात आले.
गारमाळ येथील शाळेत काव्या चा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला,यावेळीं किशोर शिंदे,तनया शिंदे ,सहज सेवा फाउंडेशन,खोपोलीचे अध्यक्ष शेखर जांभळे,आतकरगाव ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय शेडगे, मुख्याध्यापक श्रीकांत पोकळे शिक्षक फटांगरे,शिक्षिका सुनंदा भोसले, अंगणवाडी सेविका रुपाली चिंचावडे, माजी सरपंच मारुती फाटक, येनुबाई भोसले, आदींसह अनेक मान्यवरांसह विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,