पुलवामा हल्ल्याचा अभाविपद्वारे निषेध, शहिदांना श्रद्धांजली

742

भूषण गरूड पुणे :

पुणे बिबवेवाडीत १५ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ७.३० च्या सूमारास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे आज पुण्यातील व्हीआयटी महाविद्यालयात पुलवामा येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येऊन कँडल मार्चद्वारे शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानप्रणित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद वर लवकरात लवकर कडक कारवाई केंद्र शासनाने करावी, अशी मागणी अभाविपने आज आयोजित निषेध व श्रद्धांजली सभेत केली. यावेळी या घटनेचा विविध माध्यमातून निषेध नोंदवताना, भारत सरकारने ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ म्हणुन पाकिस्तानकडून काढुन घेतल्याच्या निर्णयाचं अभाविप स्वागत करते.
अभाविप पुणे महानगर मंत्री श्री. अनिल ठोंबरे म्हणाले, “अशा दहशतवादी हल्ल्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अभाविप आज जाहिर निषेध व्यक्त करते आणि सरकारला आरोपींवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी करते.”
सदर मार्च महेश सोसायटी चौक ते व्हिआयटी कॉलेज पर्यंत काढण्यात आला.
यावेळी अभाविप चे व्हीआयटी महाविद्यालयाचे अध्यक्ष तन्मय जोशी यांनी कँडल मार्चचे नेतृत्व केले, लक्ष्मीकांत देशपांडे यांनी श्रध्दांजली वेळी मनोगत व्यक्त केले, जतीन कूलकर्णी यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी संभाळली व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत शहीदांना श्रद्धांजली वाहिली व झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला.