“आनंदी गोपाळ” सामान्य मुलीचा दैदीप्यमान प्रवास

2036

योगेश बारसकर, पुणे

शंभर वर्षांपूर्वी महिलांना शिक्षणासाठी करावी लागणारी धडपड आज लक्षातही येऊ शकत नाही. ज्या काळात महिलांनी घराबाहेर पडणे हे सुद्धा अडचणीचे होते त्या काळात एका छोट्या मुलीने जिद्दीच्या जोरावर डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास केला. आजच्या काळामध्ये गोष्ट सहज वाटत असली तरी शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी ते निश्चितच दैदिप्यमान होती. होती अशा या सर्वसामान्य आनंदीबाई जोशी या देशातील पहिल्या महिला डॉक्टरचा असामान्य असा प्रवास दैदिप्यमान पद्धतीने दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी आनंदी गोपाळ या चित्रपटांमध्ये अतिशय प्रभावीपणे मांडला आहे.
इतर सर्वसामान्य मुलींप्रमाणेच आनंदी चे जीवन लग्नापूर्वी पर्यंत चालू होते. अशातच वयाच्या नवव्या वर्षी गोपाळराव जोशी या आनंदी यापेक्षा वीस वर्षांहून मोठ्या असलेल्या विजवराशी तिचे लावले जाते.लग्न आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे लग्न होण्यासाठी आनंदीचे आई-वडील गोपाळराव जोशी यांच्या अनेक अटी मान्य करतात परंतु लग्नानंतरही आनंदीला शिकविण्याचा शिकविण्याचा त्यांचा इरादा आई-वडिलांना पटत नाही. परंतु तरीही मुलीचे दोनाचे चार हात करण्याचे घाई मध्ये मध्ये आई वडील आनंदीचे लग्न लावून देतात. यानंतर आनंदीच्या आयुष्याला वेगळे वळण मिळते.परंतु तिरसट आणि तापट स्वभावाच्या गोपाळराव जोशी यांचा आनंदीला शिकवण्याचा त्यासाठी त्यांनी आनंदी चा शारीरिक आणि मानसिक दिलेला त्रास, अतिशय प्रभावीपणे दिग्दर्शकाने मांडला आहे.यामध्ये कथा ही अनेकांना माहिती असली तरी अतिशय बांधीव अशी पटकथा असल्यामुळे दिग्दर्शकाला जी गोष्ट सांगायची आहे त्यामध्ये रंजन निर्माण होते. कलाकारांची उत्तम निवड यासाठी दिग्दर्शकाला पैकीच्या पैकी मार्क द्यायला हवे ललित प्रभाकर याने साकारलेला तिरसट गोपाळराव जोशी हा प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. छोट्या भूमिकांमध्येही योगेश सोमण क्षिती जोग आपले काम प्रभावीपणे पार पाडतात. अभिनयामध्ये सर्वाधिक कमाई केली आहे केली आहे ती आनंदीच्या भूमिकेमध्ये असलेल्या भाग्यश्री हिने. लग्नापूर्वी असणारी अल्लड यशोदा, लग्नानंतर नवऱ्याला दचकणारी, शिकण्याचा हट्ट केल्यानंतर त्यांना सुरुवातीला विरोध करणारी आणि त्यानंतर गोपाळरावांचा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करूनही शिकण्याची जिद्द कायम ठेवणारी आनंदी, भाग्यश्रीने अतिशय प्रभावीपणे साकारली आहे. कथा अतिशय जिवंत होण्या मध्ये जसा वाटा कलाकारांचा आहे. त्याप्रमाणेच कला दिग्दर्शन आणि निर्मिती व्यवस्थापकांनी ही अतिशय प्रभावीपणे काम केले आहे त्यामुळे चित्रपटाला एक प्रकारचा जिवंतपणा आला. आहे. मध्यंतरापूर्वी पर्यंत वेगाने होणारा प्रवास मध्यंतरानंतर मात्र काहीसा रेंगाळतो. काही उणिवा असल्या तरी एका सर्वसामान्य मुलीचा, ज्या मुलीने आपल्या जिद्दीने देशाचे नाव उज्ज्वल केले आणि वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी देशाची पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला अशा सर्वसामान्य मुलीचा असामान्य प्रवास अनुभवण्यासाठी आनंदी गोपाळ हा चित्रपट एकदा तरी पहायलाच पहायलाच हवा.