राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कश्मीर पुलवामा येथील शहिदांना श्रद्धांजली

769

अनिल चौधरी, पुणे

 कश्मीर पुलवामा येथे सी.एस. आर.एफ. च्या जवानांवर हल्ला झाला त्याचा संपूर्ण देशातून तीव्र निषेध होत आहे. जगातली जी महान राष्ट्र आहेत त्यापैकी आपले हे राष्ट्र आहे. आपल्या राष्ट्रावर आक्रमणे झाली; परंतु आपल्या राष्ट्राने आतापर्यंत कुठल्याही देशावर आक्रमण केलेले नाही. ती आपली संस्कृतीही नाही. परंतु दहशतवाद आतंकवाद यांनी प्रत्येक वेळी आपला देशच रक्तरंजित होत आहे. शेजारील राष्ट्रे वारंवार कुरघोडी करत आहे. चौदा तारखेला झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोंढवा येथील नरवीर तानाजी मालुसरे चौकामध्ये निषेध व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी नगरसेविका नंदा लोणकर, माजीं महापौर प्रशांत जगताप , नगरसेवक हाजी गफूर पठाण, नारायण लोणकर, स्वीकृत नगरसेवक संजय लोणकर, बापू मुलाणी, रईस सुंडके, राहुल लोणकर, फारुख इनामदार, हसीना इनामदार, विशय आचार्य, ओंकार घुलेपाटील, मनोज घुले, सचिन सातव, अशिष पाटील, प्रविणकुमार आंनद तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नारायण लोणकर यांनी केले होते.