चिमुकल्यांच्या कलागुणांनी रंगले ग्लोरी इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन

1665

अनिल चौधरी, पुणे :-

वाई तालुक्यातील मेणवली येथील जनाई एज्युकेशनल सोसायटीचे ग्लोरी चिल्ड्रन्स अकॅडेमी इंग्लिश हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणगौरव सोहळा ग्रामदैवत वाघजाईमाता  मंदिरा समोरील मोकळ्या मैदानात दणक्यात पार पडले. यावेळी छोट्या कलाकारांनी कलेचे विविध रंग उधळत सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी शाळेचे विश्वस्त मधुकर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध उद्योजक व रोटरी क्लब वाईचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, डिजिटल मिडीया असोसिएशनचे अध्यक्ष व पत्रकार संरक्षण समितीचे राज्य सचिव अनिल रामचंद्र चौधरी, रोटरी क्लब वाईचे सचिव अजित क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य संतोष तांबे, उपसरपंच संगीता चौधरी, अजय चौधरी, युवराज चौधरी, हरिश्चंद्र चौधरी, विजय चौधरी, सपना लोंढे, मीना मधुकर चौधरी या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ग्लोरी चिल्ड्रन्स स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उपस्थीत पालक आणि विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या मैदानात यावेळी आपला वार्षिक स्नेहसंमेलन थाटात साजरा केला.

   प्राथमिक विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढे पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या डान्सने संपूर्ण मैदानाला ताल धरायला लावले. या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध प्राकारचे डान्स. त्यांनी इतक्या प्रभावीपणे डान्स केले  की उपस्थितांनी उभे राहून याला मानवंदना दिली.विद्यार्थ्यांनी विविध पारंपारिक लोकनृत्यांनी व मायकल जॅकसन स्टाईल डान्सनी उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडले.

     विद्यालयाच्या वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आणि शिक्षकांचा सन्मान सुद्धा करण्यात आला.                                                                                                                                         कार्यक्रमाची सांगता करताना “वंदेमातरम” या सुप्रसिद्ध भारतीय गीताने सादरीकरण करत जाता जाता विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकतेचा संदेश दिला.यावेळी शाळेच्या उपक्रमांची प्रस्तावना सचिव, मुख्याध्यापिका मीना चौधरी यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ग्लोरी चिल्ड्रन स्कूल आणि जनाई एजुकेशनल सोसायटीचे अध्यक्ष मधुकर चौधरी म्हणाले, वाई सारख्या ग्रामीण भागात असलेल्या या प्राथमिक विद्यालयाचा निकाल गत तीन वर्षांपासून शंभर टक्के लागतो. आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून गेली तीन वर्षे आम्ही दररोज ३०० गोरगरीब- गरजू मुलांना सकाळचा नाष्टा देत आहे. माफक फी मध्ये वाईमध्ये इंग्रजी माध्यमाच्या मुलांना उच्च प्रतीचे, दर्जेदार शिक्षण देत आहोत. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हे एकमेव आमचे उद्दिष्ट आहे. मुलांच्यावर होणाऱ्या संस्कार, आरोग्य दर्जेदार शिक्षणावर आम्ही विशेष लक्ष देत आहोत. मुलांच्या शाररीक आणि आरोग्यासाठी शाळेचे प्रशस्त असे पावणेदोन एकरचे खेळाचे मैदान आहे. शाळेमध्ये सर्व प्रकारचे धार्मिक सण साजरे केले जातात, त्याबद्ल विद्यार्थाना माहिती दिले जाते. वाई परिसरातील १६ गावांमधील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. शाळेची प्रशस्त अशी कॉम्पुटर लॅब आहे यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्पुटरचे ज्ञान दिले जाते. शाळेमध्ये सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. तसेच स्वच्छतेचे पाठ विद्यार्थ्यांना दिले जातात.

याप्रंगी शाळेचे शिक्षक रेश्मा येवले, रेश्मा कोंडाळकर, रेश्मा चौधरी, सुप्रिया मोटे, पूजा जाधव, अर्चना सोळसकर, अक्षदा पोफळे, प्रमिला शिंदे, शबाना अन्सारी, रुपाली चौधरी, अजय चौधरी, संतोष चौधरी, अनिल चौधरी, मोहन निंबाळकर, भिकू चौधरी, गणेश चौधरी, शेखर चौधरी रामदास चौधरी तसेच मोठ्या प्रमाणात मेणवली वाई परिसरातील पालक- विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.