९ व्या चित्र पदार्पण पुरस्कारांची नामांकने जाहीर

891

अनिल चौधरीपुणे

नवोदित कलाकारांना प्रोत्याहन देण्यासाठी डिव्हाईन कॉज सोशल फौंडेशन आणि मराठी चित्रपट परिवारतर्फे आयोजित ९ व्या चित्रपदार्पण पुरस्कारांची नामांकने जाहीर करण्यात आली. यामध्ये रेडू, चुंबक आणि हॉस्टेल डेज या चित्रपटांना सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत. 

रेडू, मंत्र, चिठ्ठी, चुंबक, अबक, फर्जंद, पुष्पक विमान यस चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ठ चित्रपटासाठी स्पर्धा आहे तर सागर वंजारी (रेडू), दिग्पाल लांजेकर (फर्जंद), हर्षवर्धन (मंत्र), राम शेडगे (अबक), संदिप मोदी (चुंबक), वैभव डांगे (चिठ्ठी) वैभव चिंचाळकर (पुष्पक विमान) यांच्यामधून सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक ठरणार आहे, अशी माहिती डिव्हाईन कॉज सोशल फौंडेशनच्या प्रमुख प्रिती व्हिक्टर आणि सुनंदा काळुसकर यांनी दिली.
सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागासाठी शुभंकर एकबोटे (चिठ्ठी), सौरभ गोगटे(मंत्र), सुव्रत जोशी (शिकारी), अंकित मोहन (फर्जंद),साहिल जाधव (चुंबक) यांना नामांकने मिळाली आहेत. तर अभिनेत्री साठी प्रणाली घोगरे (रणांगण), तृप्ती तोरडमल (सविता दामोदर परांजपे), नेहा खान (शिकारी), मालविका गायकवाड (मुळशी पॅटर्न ), गौरी किरण (पुष्पक विमान), धनश्री काडगांवकर (चिठ्ठी), गायत्री जाधव (बबन) यांच्यामध्ये चुरस आहे.
नॉन फिल्मी म्युझिक अल्बम विभागामध्ये यु अ‍ॅन्ड मी (व्हिडीओ पॅलेस), चल ऊसामंदि जाऊ, झिलमिल, तू नसताना रिमझिम रिमझिम, हलकेच निळा घन आला, साहिबा या गाण्यांना विविध विभागामध्ये नामांकने मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट कथा, पटकथा, संवाद यांसह २२ विविध विभागांध्ये पुरस्कार देण्यात येणार आहेत