Monday, April 28, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेबिबवेवाडीत सर्वधर्म समभाव शिवजन्मोत्सव पालखी मिरवणुक

बिबवेवाडीत सर्वधर्म समभाव शिवजन्मोत्सव पालखी मिरवणुक

भूषण गरुड पुणे.
बिबवेवाडी मध्ये बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास गनिमी कावा युवा सेवा संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे व माजी नगरसेवक दिनेशभाऊ धाडवे यांच्यातर्फे सर्वधर्म समभाव या उद्देशाने बिबवेवाडीत सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत गुलाल, फुलांची उधळण करीत शाही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत ढोल, ताशे असे विविध पारंपरिक वाद्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. शाही मिरवणुकीमध्ये महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणुकीची सुरुवात अप्पर जुना बस स्टॉप पासून ते बिबवेवीड पर्यंत सायंकाळी चार ते सात सुमारास बिबवेवाडी पोलिसांच्या बंदोबस्तात शांततेत पार पडली.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!