प्रविण विठ्ठल तरडे यांची नवीन कलाकृती सरसेनापती हंबीरराव

1894

अनिल चौधरी, पुणे

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्वधगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे कार्य लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. पुण्यात शिवजयंतीच्या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात सुप्रसिद्ध लेखकदिग्दर्शकअभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केली. 

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होतेढोल-ताशा पथकभगवे ध्वजरणशिंगपारंपरिक लाठी – काठीशिवकालीन मर्दानी खेळ यांच्या  साथीने अवघा परिसर शिवमय झाला होता. यावेळी शिवनेरी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि हंबीरराव मोहिते यांचे वंशज संदीप मोहिते पाटीलबीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाडजिल्हा परिषद सदस्य आणि युवा नेते रोहित पवारआमदार भीमराव तापकीरदत्तात्रय धनकवडेअमित गायकवाड अभिनेता रमेश परदेशीदेवेंद्र गायकवाडमहेश हगवणेन्यूक्लियस सप्लिमेंटचे श्रीपाद चव्हाणलीड मिडीयाचे विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते. या भव्यऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटीलसौजन्य सुर्यकांतराव निकमधर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथापटकथासंवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना प्रविण विठ्ठल तरडे म्हणालेहंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होते. त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने स्वराज्याला श्रीमंत केले. हंबीरराव मोहितेंच्या नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात बघायला मिळेल. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजनामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. तर हंबीरराव यांच्या प्रमुख भूमिकेत कोणयाचा उलगडा शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून २०१९ रोजी होणार आहे. हा चित्रपट जानेवारी २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल असेही तरडे यांनी सांगितले.