संत सेवालाल महाराज यांची २८० वी जयंती पिरंगुट येथे उत्साहात साजरी

815

अनिल चौधरी, पुणे 

संत सेवालाल महाराज यांची २८० वी जयंती पिरंगुट,ता.मुळशी येथे मोठ्या उत्साहात,वाजत गाजत मिरवणूक काढून साजरी करण्यात आली.या प्रसंगी जिल्हापरिषद सदस्य सागर काटकर,अंजली कांबळे,विद्यार्थीसेनेचे उपाध्यक्ष राम गायकवाड,भावना फौंडेशनचे संस्थापक आणि युवा उद्योजक सुनील राठोड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.जयंतीनिमित्त मोठ्या संखेने तालुक्यातील समाज एकत्र झाला होता.बंजारा समाजातील आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठी शासनाने नवनवीन योजना राबविल्या पाहिजेत असे सुनील राठोड यांनी सांगितले.राम गायकवाड यांनी बंजारा समाजातील बांधवांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्नशील राहू असे सांगितले,या प्रसंगी जि.प.सदस्य शंकर माडेकर,विलास अमराळे,राहुल पवळे,रामदास पवळे,आत्माराम ववले,सुरज शिंदे,युवराज राठोड,नितीन पवार,विक्रम चव्हाण,रमेश चव्हाण,अक्षय राठोड,श्रीकांत राठोड आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन भावना फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राठोड यांनी केले.