मल्हार न्यूज प्रतिनिधी :-
नाशिक येथील देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश सुपडू सपकाळे व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ताराचंद शेलार यांना १५००० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, देवळा पोलीस स्टेशन मध्ये एका ३६ वर्षीय तक्रारदाराचे आणि त्यांचे नातेवाईकांचे कडाक्याचे भांडण झाले होते. तक्रारदाराने त्याच्या नातेवाईकांविरुद्ध नाशिक येथील देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याने पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेलार यांच्याशी संपर्क करून नातेवाइकांविरुद्ध कडक कारवाई करण्यास सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक सपकाळे याने तक्रारदाराकडे २५००० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. यापैकी ५००० हजार रुपये उपनिरीक्षक राजेंद्र शेलार यांना तर १०००० हजार रुपये पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे असे देण्याचे ठरविले.
याबाबत तक्रारदाराला लाच दण्याचे मान्य नसल्याने ,तक्रारदाराने नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क केला व तक्रार दाखल केली. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता ती खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्वरित लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने देवळा पोलीस ठाण्यात सापळा लावला. तक्रारदाराने पोलीस निरीक्षक सुरेश सुपडू सपकाळे यांचे १०००० हजार रुपये व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेलार यांचे ५००० हजार रुपये असे ऐकून १५००० हजार रुपयांची लाच पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेलार यांना देताना देवळा पोलीस ठाण्यात रंगेहात पकडण्यात आले आहे.