Thursday, April 24, 2025
Google search engine
Homeमहाराष्ट्रआमदार प्रशांत ठाकूर ह्यांच्या पाठपुराव्याला यश

आमदार प्रशांत ठाकूर ह्यांच्या पाठपुराव्याला यश

आमदार प्रशांत दादा ठाकूर ह्यांच्या पाठपुराव्याला यश
मिळाले असून महामार्गावरील खांदा कॉलनी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण केले . हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने या भागातील नागरिकांचा त्रास कमी होईल आणि वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.
खांदेश्वर तलाव ते पळस्पे फाटा या भागात सतत वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या तीन किमी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्याने 39 कोटी रुपयांचे काम मंजूर करण्यात आले. यामध्ये गाढी आणि काळुंद्री नदीवरील दोन पूल, 5 मोर्‍या आणि खांदा कॉलनी येथील भुयारी मार्ग यांचे काम हाती घेण्यात आले. गाढी नदीवरील पूल यापूर्वीच वाहतुकीस खुला झाला; तर काळुंद्री नदीवरील पूल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईप लाईनमुळे रखडला होता. त्याचेही काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहे .
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!