भूषण गरूड पुणे.
हायलाइट्स भारतीय बनावटीचे पहिले लढाऊ विमान तेजसमधून लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी उड्डाण केले. शस्त्र निर्माण करणारी देशातील सरकारी कंपनी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने तेजसची निर्मिती केली आहे. तेजस या लढाऊ विमानाचा हवाई दलात होणारा समावेश म्हणजे ‘मेक इन इंडिया’ या अभियानाचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. नवी दिल्ली भारतीय बनावटीचे पहिले लढाऊ विमान तेजसमधून लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी उड्डाण केले. बंगळुरूतील ‘एअरो इंडिया २०१९’ या कार्यक्रमांतर्गत लष्कर प्रमुखांनी उड्डाण करत स्वदेशी लढाऊ विमानाची पाहणी केली. शस्त्र निर्माण करणारी देशातील सरकारी कंपनी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने तेजसची निर्मिती केली आहे. फायटर जेटमध्ये उड्डाणापूर्वी रावत यांनी उपस्थित अधिकारी आणि लोकांना हात दाखवत अभिवादन केले. कालच (बुधवार) मिलिटरी एव्हिएशन रेग्युलेटरने तेजसला अंतिम मंजुरी दिली. आता या लढाऊ विमाना भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात समावेश होईल. हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांच्याकडे बुधवारी एअरोइंडिया शोदरम्यान मंजुरीबाबतचा दाखला सुपूर्द करण्यात आला. तेजस या लढाऊ विमानाचा हवाई दलात होणारा समावेश म्हणजे ‘मेक इन इंडिया’ या अभियानाचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.