केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्तेप्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा राज्यात शुभारंभ

666

प्रतिभा चौधरी, पुणे

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचे (पीएम किसान) उद्घाटन उत्तर प्रदेश मधील गोरखपूरयेथे आज झाले  . या योजनेचा महाराष्ट्रातील शुभारंभ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुण्यात झाला. राज्याचे कृषी आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,  कृषी व फलोत्पादन सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, कृषी आयुक्त्‍ सुहास दिवसे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना (पीएम किसान)

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे अशा छोट्या आणिवंचित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातील ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीनहप्त्यांमध्ये देण्यात येईल ही रक्कम सरळ लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाईलयाद्वारे पूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणली जाईल.

छोट्या आणि वंचित शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती तिचा लाभकिमान 12 कोटी शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा

आहे.

श्री जावडेकर यांच्या ह्स्ते लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठीची ही सर्वात मोठी योजना आहे . केंद्रातील मोदी सरकारने शेतक-यांच्या हितासाठी गेल्या पाच वर्षात अनेक योजना सुरु केल्या आहेत .  शेतजमीन मृदा आरोग्य पत्रिका, शेतकऱ्यांना निम कोटींगनेयुक्त युरियाचा पुरवठा, सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतीसाठी मुबलक कर्ज पुरवठा, शेतमालाला किफायतशीर भाव, शेतीसाठी पूरेसा पाणी पुरवठा तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना, अशा  योजनांमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

राज्याचे कृषी आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  पहिल्या टप्प्यात 70 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार

 आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन हप्त्यामध्ये एकूण 4 हजार 200 कोटी रुपयांचा लाभ मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. योजनेच्या

अंमलबजावणीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर संनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. असे त्यांनी सांगितले.