भूषण गरुड पुणे.
कोंढव्यातील प्रभाग क्रमांक 27 ब मधील नगरसेविका हमिदा अनिस सुंडके, नगरसेविका परविन हाजी फिरोज यांच्या विकास निधीतून व माजी स्थायी समितीअध्यक्ष अनिस सुंडके, ऑल कोंढवा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी फिरोज शेख व माजी नगरसेवक रईस सुंडके यांच्या प्रयत्नातून सोमवार दि.25 फेब्रुवारी रोजी कोंढवा भागातील सर्वे नंबर 42 मधील जे के पार्क मुख्यरस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामाचे स्थानिक नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
कोंढवातील प्रभाग क्रमांक 27 ब मधील नगरसेविकांना 23 फेब्रुवारी रोजी दोन वर्षे पूर्ण झाली या दिवशी विजय उत्सव दिवस साजरा करण्यात आला.
कोंढव्यातील प्रभाग क्रमांक 27 ब मधील नागरिकांनी दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांनवर विश्वास ठेवून मतदान करून विजयी केल्याबद्दल माजी नगरसेवक रईस सुंडके यांनी नागरिकांचे धन्यवाद मानले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे व नागरिकांसाठी नगरसेवक प्रत्येक वेळी उपलब्ध आहेत असे मत माजी नगरसेवक रईस सुंडके यांनी व्यक्त केले.
कोंढवातील प्रभाग क्रमांक 27 ब मधील नगरसेविका परविन हाजी फिरोज व हमिदा सुंडके यांच्या माध्यमातून सांस्कृतिक भवन अभ्यासिका वर्ग व प्रसूतिगृह हॉस्पिटलच्या भूमिपूजन व कामाची सुरुवात होणार आहे. प्रभागाचा मागील पंधरा वर्षात कोणताही विकास झाला नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दोनच वर्षात विकास करून प्रभागाचा कायापालट केला. असे मत ऑल कोंढवा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी फिरोज यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी, माजी नगरसेवक फारूक इनामदार, मौलाना फरीद, मुफ्ती शाहिद, जाहिद भाई, नूर भाई, समीर भाई, करीम पठाण, अफसर भाई, सादिक भाई, सकलेन चौधरी, जावेद भाई व परिसरातील नागरिक उपस्थित होते.