पोलिस असल्याची बतावणी करून येमन नागरिकाला लुटले

768

भूषण गरूड पुणे.

पुण्यात रविवारी दि.24 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 सुमारास कौसर बाग येथे बहिणीचा उपचारासाठी आलेल्या येमन नागरिक अब्दुल करीम अलमेरी(वय 54) यांना पोलिस असल्याची बतावणी करत 2 लाख 1 हजार 825 रुपयाचे परदेशी चलन लंपास केले. याप्रकरणी, दोन अनोळखी इसमांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येमन नागरिक अब्दुल अलमेरी हे भारतात बहिणी वर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी पुण्यात आले. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बहिणी वर वैद्यकीय उपचार चालू होते. उपचाराला अनेक दिवस लागत असल्याने त्यांनी कोंढवा मध्ये कौसर बाग येथे फ्लॅट भाड्याने घेतला. रविवारी दिनांक 24 फेब्रुवारी दुपारी 3.30 सुमारास येमन नागरिक अब्दुल अलमेरी हे कौसर बाग येथून चालत जात असताना. पांढऱ्या रंगाच्या कारमधून दोन अनोळखी इसमानी त्यांच्याजवळ येऊन पोलीस असल्याची बतावणी करत. कुठून आलास, कुठे राहतोस, कुठे चाललास, आम्ली पदार्थ आहेत का ? विचारणा करीत त्यांची झाड झडती घेत त्यांच्याजवळील कागदपत्रे व पैसे काढून घेतली व थोड्यावेळाने परत करत निघून गेले. अब्दुल अलमेरी थोड्या अंतरावर गेले असता कागदपत्र, पैसे बघितल्या वर त्यांच्या लक्षात आले की यामध्ये भारतीय चलनाच्या नोटा आहेत परंतु विदेशी चलनाच्या नोटा गायब होत्या. त्या नोटांची भारतीय चलनात 2 लाख 1 हजार 825 रुपये होतात. त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत. दोन अनोळखी इसमांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

    तक्रारीची दखल घेत, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश कुर्चे तपास करीत आहेत.