अनिल चौधरी, पुणे
प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अर्बन रोमँटिक कॉमेडी जॉनर असलेलामराठी सिनेमा ‘ती अँड ती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती अँड ती’ या सिनेमात प्रेक्षकांना नवीनविषयासह पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी याकलाकारांची युनिक निवड, सोबतीला मजेशीर डायलॉग्स, सुंदरगाणी आणि लंडनमध्ये पूर्ण सिनेमा शूट झाल्यामुळे तेथील लोकेशनअनुभवयाला आणि पाहायला मिळणार आहेत.
या सिनेमाच्या निमित्ताने पुण्यातील पत्रकारांसोबत मनमोकळासंवाद साधण्यासाठी ‘ती अँड ती’ सिनेमाच्या टीमची पुण्यात पत्रकारपरिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेतदिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, कलाकार पुष्कर जोग, सोनालीकुलकर्णी, प्रार्थना बेहरे, सिध्दार्थ चांदेकर, निर्माते वैशाल शाह, मोहननादर, लेखक विराजस कुलकर्णी उपस्थित होते.
‘ती अँड ती’ सिनेमाची कहाणी आहे ‘अनय’ची जो एक स्वप्नाळूमुलगा आहे. चौथीत असताना शाळेतल्या एका मुलीवर त्याचा जीवजडतो आणि “ती” शाळा सोडून गेल्यावरही तो “तिला” कधीचविसरू शकत नाही. रोमान्सच्या त्याच्या कल्पना मनातच राहतात. पण एके दिवशी जणू देव त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याची “ती” त्याला भेटते… प्रॉब्लेम एवढाच असतो की तेव्हा तो त्याच्या बायकोबरोबर हनिमूनला गेलेला असतो.
इंग्लंडच्या निसर्ग सुंदर लोकेशन्सवर चित्रित झालेल्या “ती आणि ती” च्या कथानकात जेवढी गंमत आहे तीच धमाल आपल्याला या “रॉम-कॉम” मध्ये बघायला मिळणार आहे. निर्माता आणि प्रमुख भूमिकाअशा दोन्ही जबाबदाऱ्या पुष्कर जोगनी यशस्वीरित्या सांभाळल्याआहेत. चित्रपटातल्या “ती” आणि “ती” च्या भूमिकेत सोनालीकुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे ह्यांनी सुरेख रंग भरले आहेत सिद्धार्थचांदेकर ही एका विशेष भूमिकेत आपल्याला या चित्रपटात भेटेल.
प्रत्येक चित्रपटात नवीन काही करू बघणारी अभिनेत्री-दिग्दर्शिकामृणाल कुलकर्णी या वेळी रंगतदार कथेतून तरुण पिढीच्या मनातीलकन्फ्युजन दाखवताना दिसते. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हेइंग्लंड मध्ये झालेले आहे आणि गंमत म्हणजे या चित्रपटाची कथापटकथा विराजस कुलकर्णी ह्यांनी लिहिलेली आहे. संवादलेखकआहेत मर्मबंधा आणि विराजस कुलकर्णी.
चित्रपटाला संगीत नव्या दमाच्या साई-पियुष ह्यांनी दिले आहे आणिचित्रपटातील धमाल गाण्यांना आवाज अवधूत गुप्ते, महालक्ष्मीअय्यर, रोहित राउत, जुईली जोगळेकर, गौरव बुरसे आणि अर्पिताचक्रवर्ती यांनी दिला आहे. छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळलीआहे हर्षवर्धन पाटील ह्यांनी तर संकलन आहे अर्जुन मोगरे ह्यांचे, ध्वनी लेखक आहेत स्वराधीश स्टुडियोचे स्वरूप जोशी तर प्रमुखसहायक दिग्दर्शक आहेत जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी.
आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प्सएंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुतीकेली आहे. वैषल शाह, पुष्कर जोग आणि मोहन नदार ह्यांचीनिर्मिती असलेला “ती & ती ” ८ मार्च २०१९ रोजी सर्वत्र प्रदर्शितहोत आहे.