पुण्यधाम आश्रमातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

896

अनिल चौधरी, पुणे

पुण्यधाम आश्रम आणि आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांचे एएफ एम सीचे  तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत न्रेत्र तपासणी ,औषधे, मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मोतीबिंदुच्या मोफत शस्त्रक्रिया देखील आधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहेत.

   याबाबत अधिक माहिती देताना आश्रमाच्या अधिकारी अमिता बैंदूर म्हणाल्या कि, या शिबिरात नागरिकांच्या आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने डोळ्यांच्या तपासन्या करण्यात आल्या आहेत.  तसेच रुग्णांना मोफत औषधे दिली आहेत. मोफत उत्तम दर्जाचे चांगले चष्मे देण्यात आले आहेत. ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांच्या शत्रक्रिया आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) च्या हॉस्पिटल मध्ये आधुनिक तंत्रज्ञाने करण्यात येणार आहे. आम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवत आहे. नागरीकांचा देखील प्रतिसाद अतिशय उत्तम मिळत आहे .

   याप्रंगी पुण्यधाम आश्रमाच्या माताजी कृष्णा कश्यपजी ,  एएफएमसी चे ब्रिगेडियर पुरिंदर कुमार डोग्रा,  कर्नल संदीप, मेजर सुनंदन आणि त्यांची सर्व मेडिकल टीम आश्रमाच्या अधिकारी अमिता बैंदूर,  ट्रस्टी शमशेठ मरळ , गणेश कामठे , विठ्ठल घोमण आदि उपस्थित होते .