महाशिवरात्रीनिमित्त सिद्धेश्वर मंदिरात भक्तांचा महापूर

649

अनिल चौधरी, पुणे

महाशिवरात्रीनिमित्त  पुण्यधाम आश्रम मधील सिद्धेश्वर महादेव मंदिरात भक्तांचा महापूर पहावयास मिळाला असून , महाशिवरात्री निमित्त भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.
सकाळी पहाटे चार वाजता मंदिराचे ट्रस्टी गणेश कामठे यांच्या हस्ते अभिषेक, होम होऊन भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले .यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने उपवासाची खिचडी, केळी , लिबु पाणी , राजगिरा लाडू पाण्याची सोय करण्यात आली होती . यावेळी पुण्यधाम आश्रमाच्या माताजी कृष्णाजी कश्यप, गणेश कामठे, शामसेठ मरळ, विठ्ठल घोमण, माऊली कामठे, वसंत कामठे, शिवाजी बधे, मधुकर मरळ, विमल कामठे, माधुरी धांडेकर, कैलास वाघ, यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात येत होते .