गरोदरपणात स्त्रियांनी घ्यावयाची काळजी याविषयावर मार्गदर्शन शिबीर

745

महिलादिनानिमित्त खराडीतील मदरहूड हॉस्पीटलचा उपक्रम

अनिल चौधरी, पुणे – 
 गरोदरपणात स्त्रियांच्या मनातील प्रश्नत्यांच्या समस्याया दिवसांमध्ये घ्यावयाची काळजी यांबाबत खुलेपणाने चर्चात्मक संवाद साधण्यासाठी खराडी येथील मदरहूड रुग्णालयाच्या वतीने मोफत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरांतर्गत भावी पालकांना मार्गदर्शन केले जाणार असून त्र डॉक्टरांच्या उपस्थितीत गरोदरपणासंबंधी शंकांचे निरसन केले जाणार आहे. यामध्ये स्त्रीरोग तज्ञ तसेच प्रसूतीशास्त्रज्ञ डॉ राजेश्वरी पवारडॉ. प्रीती त्यागीडॉ स्वाती गायकवाडसिनीयर फिजीओथेरेपीस्ट क्रितीका बोलीयामनोविकारतज्ञ रुथ फर्नांडिस निओनॉलॉजिस्ट आणि बालरोगतज्ज्ञ डॉ तुषार पारिख यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये गर्भधारणेचे विविध पैलूबाळंतपणा आणि पालकत्व तसेच पालक होताना अशा विविध विषयांवर चर्चात्मक संवाद साधणार आहे.                                                           या कार्यक्रमाला आहारतज्ञांकडून स्त्रियांना मार्गदर्शन केले जाणार असून गर्भारपणाती सकस आहारफिटनेसगरोदररपणातील फॅशनलेबर मॅनेजमेंट आदी विषयांवरही चर्चा केली जाणार आहे. या शिबीरातंर्गत भावी पालकांकरिता मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.  हे शिबीर ९ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजेपासून सरू होणार आहे . सदर शिबिर रॅडिसन ब्ल्यु हॉटेलखराडी येथे होणार असून पूर्व नाव नोंदणीकरिता संपर्क – 9606477241 करून आपण http://services.motherhoodindia.com/itap    या वेबसाईटवर देखील नोंदणी करू शकता . अशी माहिती हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे.