अनिल चौधरी, पुणे
पुणे महानगपालिका तसेच “रुबल नागी आर्ट फौंडेशनच्यावतीने” सी.एस.आर. अंतर्गत २८/०२/२०१९ पासून जनता वसाहतीमधील झोपडपट्टीमधून रंगकामास सुरुवात झालेली असून स्वच्छता मोहिमेसह विविध रेंगी रंगकाम झोपडपट्ट्यांना देण्याचे कामकाज मोठ्या प्रमाणावर सुरु झालेले आहे.
शहरातील झोपडपट्ट्या व परिसरातील भागात “महापरिवर्तन” कार्यकामाच्या अनुषंगाने “पुणे महानगरपालिकेच्या सहाय्याने रुबल नागी आर्ट फौंडेशन सी.एस.आर. अंतर्गत पुणे झोपडपट्टी परिवर्तन प्रकल्पा अंतर्गत रंगकाम,चित्रकला या बरोबरच सुशोभीकरणासह या परिसरातील स्वछ्तेसह महिला सक्षमीकरण,महिला,मुले,मुली यांना रोजगार,प्रशिक्षण,मार्गदर्शन करीत आहेत.या कार्यकामाच्या अंतर्गत ८ मार्च २०१९ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जनता वसाहतीमधील सीताराम नारायण गावडे शाळा क्र. १२८ ब येथील सुमारे ३०० मुलींना रंगकाम,चित्रकला या संदर्भात सकाळी ९ ते १२ वेळात प्रशिक्षण दिले जाणार आहे.या प्रसंगी मा. रुबल अगरवाल अतिरिक्त महापालिका आयुक्त व अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच ११ मार्च रोजी या शाळेतील विद्यार्थ्यांना चित्रकला,रंगकाम विषयक प्रशिक्षण सकाळी ११ ते ३.३० या वेळात दिले जाणार आहे याप्रसंगी ,महापालिका आयुक्त मा. सौरभ राव उपस्थित राहणार आहेत. येथील कामकाजाच्या सुरुवातीपासून तसेच रंगकाम,चित्रकला,स्वच्छता मोहीम व नागरिकांचा सहभाग या सर्व स्तरावर या भागातील मा.सभासद आनंद रिठे,मा.प्रिया गदादे.मा.सौ.अनिता कदम,मा.शंकर पवार यांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर आहे.तसेच येथील नागरिक ,कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत.
चित्रकला,रंगकाम प्रशिक्षणासह या परिसर स्वच्छता मोहीम १२ मार्च व १५ मार्च रोजी राबविण्यात येणार असून घनकचरा व्यवस्थापन विभागासह जनता वसाहतीमधील नागरिकांच्या सहभागासह स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.सदर प्रसंगी मा.महापालिका आयुक्त सौरभ राव व संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.