अनिल चौधरी, पुणे
पुणे महानगपालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये पहिल्या हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात कर्माचारी मातांसाठी आपल्या बाळाला वेगळ्या कक्षात बसून स्तनपान देता यावे याकरिता हिरकणी कक्षाचे लोकार्पण महापौर मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आले.
याप्रंगी बोलताना महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या , जर व्यवस्थापनाने महिला कर्मचाऱ्यांना हिरकणी कक्षाची सुविधा निर्माण करून दिली तर व्यवस्थापनाला त्याचा फायदा होऊ शकतो. महिला कर्मचाऱ्यांची कार्यालयाशी निष्ठा वाढते.आई बाळाच्या आजारपणासाठी कमी रजा घेते. आई व मुलांच्या वैद्यकीय खर्चात बचत होते. कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या स्वास्थाची काळजी व्यवस्थापनाला आहे, हे दिसून येते. कर्मचाऱ्यांची उत्पादन क्षमता वाढते या हेतूने “हिरकणी कक्ष” स्थापना भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात केली. अशा प्रकारचे उप्रकम राबविल्याबद्दल महापौर टिळक यांनी सर्व सेवक, अधिकारी, सेविका माता- बालक व सभासदांचे अभिनंदन केले. तसेच याच प्रकारचे हिरकणी कक्ष सर्व क्षेत्रीय कार्यालयात स्थापन करावेत असेही महापौर यावेळी म्हणाल्या .
याप्रंगी महिला बालकल्याण समिती अध्यक्ष राजश्री नवले, वार्ड ऑफिसर कडलख, अर्चनाताई पाटील, आरती कोंढरे, सुलचनाताई कोंढरे, विजयाताई हरिहर, मंगलाताई मंत्री, राजश्रीताई शिळीमकर, रफिक शेख, अजय खेडेकर,विशाल धनवडे इ.नगरसेवक , अधिकारी कर्मचारी , महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.