अनिल चौधरी, पुणे
हॅप्पी किड्स क्लबच्यावतीने ” पर्यावरण वाचवा , पृथ्वीचे रक्षण करा ” हा सामाजिक संदेश वार्षिक स्नेहसंमेलनामधून विद्यार्थ्यांनी समाजास दिला . पुणे कॅम्प भागातील आझम कॅम्पसमधील असेम्ब्ली हॉलमध्ये झालेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे सदर्न स्टार आर्मी प्री प्रायमरी स्कुलच्या प्रिन्सिपॉल उर्वशी सहा उपस्थित होत्या . यावेळी हॅप्पी किड्स क्लबच्या प्रिन्सिपॉल लवीना रहेजा , प्रदीप रहेजा , अशोक रहेजा , रिया रहेजा आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनामध्ये प्ले ग्रुप , नर्सरी ज्यूनियर के. जी. चे विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपले विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले . सामाजिक संदेशामध्ये वृक्ष वाचवा , पाणी वाचवा , स्वछ भारत , ओला कचरा , सुका कचरा , वीज वाचवा , तसेच तीन आरमधील रिड्यूस , रियुज व रिसायकल जनजागृतीपर माहिती देण्यात आली.