अनिल चौधरी, पुणे
कोंढवा येथील येवलेवाडी येथे भारत सरकाराच्या आयुष मंत्रालया अंतर्गत २०० कोटी खर्चून करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा च्या निसर्ग ग्राम आयुर्वेदिक उपचार केंद्राचे भूमिपूजन केंद्रीय आयुष राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट , जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, आ.योगेश टिळेकर, आयुषच्या निदेशिका डॉ. के सत्यलक्ष्मी , खासदार अनिल शिरोळे, बसावा रेड्डी, निदेशक, मोरारजी देसाई नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ़ योगा,नवी दिल्ली येथील डॉक्टर के सेठी, नगरसेविका संगीताताई ठोसर, नगरसेवक वीरसेन जगताप उपस्थित होते. यावेळी बोलताना स्थानिक आमदार योगेश टिळेकर म्हणाले कि, हा प्रकल्प माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. ह्या उपचार केंद्रा मुळे गोरगरीब जनतेवर अगदी नाममात्र दरात उपचार होणार असून नागरिकांना एक चांगले सुसज्ज अद्ययावत तंत्रज्ञानात नैसर्गिक उपचार मिळणार आहेत. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ.के सत्यलक्ष्मी आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाल्या कि, आयुष मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्या सहकार्याने हा प्रोजेक्ट होत आहे. या निसर्गग्राम वैद्यकीय उपचारात वेगवेगळ्या आजारांवर उपचार होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने फिजीयोथेरेपी, नैसर्गिक उपचार, योग चिकित्सा, आणि अन्य प्रकारच्या नैसर्गिक पद्धतीने आजारांवर उपचार केले जाणार आहेत. या प्रोजेक्ट मध्ये अंडर ग्रेजुएट, ग्रैजुएट, पोस्टग्रेजुएट, पीएचडी, गांधियन स्टडीज अशा काही विषयांवर शिकवले जाणार आहे. यावेळी त्यांनी आयुष आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले कि, आजच्या धावपळीच्या आणि धकाधुकीच्या युगात आम्ही आपल्या तब्येतीच्या बाबतीत गाफील राहिलो आहोत.यामुळे आपल्या तब्येतीवर याचा विपरीत परिणाम होत आहे.यामुळे योग व नैसर्गिक उपचाराची आपल्याला नितांत गरज आहे. महात्मा गांधी सुधा नैर्सगिक व्यायाम करत होते व त्यांचा योग व पंच्कार्मावर जास्त विश्वास होता.
आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने या हॉस्पिटलचा आता शुभारंभ सुरु झाला आहे. हे उपचार केंद्र २५एकरमध्ये होणार असून या करीता २०० कोटी खर्च येणार असून हे २ वर्षात तयार होणार आहे. भविष्यात राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान ताडीवाला रोड पुणे येथे आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली हे उपचार केंद्र होणार आहे. येथे विविध आजारांवर उपचार केले जातात. आता त्यांना या उपचार केंद्रा मध्ये दाखल करून घेऊन उपचार देखील केले जातील. हे निसर्गग्राम उपचार केंद्र येथे झाल्यामुळे महाराष्ट्र तसेच देशाच्या कान्या कोपऱ्यातून आलेल्या नागीरकांवर अत्यल्प दारात नैर्सगिक उपचार केले जातील. विविध आजारांवर येथे उपचार केले जातील तसेच आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग, फिजीयोथेरेपी तसेच इतर विभाग येथे कार्यरत असतील. महाराष्ट्र शासनाने २५ एकर जमीन दिल्यामुळे त्यांचे योगदान महत्वाचे आहे असेही ते यावेळी म्हणाले. या निसर्ग ग्राम मध्ये मेडिकल कॉलेज ज्यामध्ये ग्रेजुएशन, पोस्ट ग्रेजुएशन, पीएचडी, फ़ेलोशिप आणि पैरा-मेडिकल कोर्सेस सुरु केले जातील. यामध्ये महात्मा गांधी यांचे जिवंत स्मारक निर्माण केले जाणार आहे. हा प्रोजेक्ट गुरुकुल पद्धतीच्या शिक्षण पद्धतीवर असणार आहे त्यामुळे रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करून नैर्सगिक पद्धतीच्या उपचार तसेच योगोपचार केले जाऊन त्या पद्धतीचे शिक्षण येथील विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. येथे रुग्णांना दाखल करून घेण्याची सुविधा असल्यामुळे या हॉस्पिटलला खूप फायदा होणार आहे. यामुळे नैर्सगिक पद्धतीने होणारे उपचार आणि योगोपचार घरोघरी पोहोचविले जाणार आहेत. १८ नोव्हेंबर २०१८ ला पहिला नैर्सगिक उपचार दिवस आपण साजरा केला.
या नैर्सगिक उपचार केंद्राच्या कामामध्ये सुधा नैसर्गिक पद्धतीचे साधन सामग्रीचा आपण वापर करणार आहे. पाण्याचे नियोजन करून पाण्याचा पुनर्वापर आपण करणार आहोत . या पाण्याचा वापर फुल झाडांना करणार आहोत. तसेच पर्यावरणाचा विचार करून पर्यावरणपूरक साधन सामुग्रीचा वापर करणार आहोत कि ज्यामुळे झिरो वेस्ट झोन बनविला जाईल. याप्रंगी आयुषचे डॉक्टर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.