पुणे मनपा आरोग्य विभागाच्या मुलाखती रद्द

652

अनिल चौधरी, पुणे

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेयर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातर्फे अस्थायी स्वरूपातील पूर्णवेळ वैदकीय अधिकारी व गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहाय्यक हि पदे 11 महिन्यांकरिता एकवट मानधनावर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदाच्या मुलाखती दि.१२/०३/२०१९ रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या, तरी सदरच्या आयोजित केलेल्या मुलाखती काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आलेल्या आहेत. तरी संबधित अर्जदार यांनी नोंद घेण्याचे आवाहन पुणे मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.