पुणे मनपाची अनाधिकृत बांधकामांवर कारवाई

1014

अनिल चौधरी,पुणे

पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन२ व ४ च्या वतीने अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येऊन १४३५४ चौ.फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

  झोन क्रं२ च्या वतीने कोंढवा ब्रू. येथील विनापरवाना बांधकामांवर महाराष्ट्र रिजनल आणि प्लॅनिंग अॅक्ट १९६६ चे कलम आणि कलम ५३(१) व कलम ४७८ (१) अन्वये नोटीस देऊन करण्यात आली. सदर कारवाई मध्ये स.नं. ६१+६२ (पार्ट) येथील ८८४ चौ.फुट , स,नं. ४ येथील ८४० चौ.फुट , तेजपाल गोटीवाला यांचे ३०० चौ.फुट, स.न.६६ येथील ६०० चौ.फुट, आणि ४००चौ.फुट असे एकूण ३०२४ चौ.फुट क्षेत्र रिकामे करण्यात आले. सदरची कारवाई २ जेसीबी, १ गॅस कटर, २ब्रेकर, १पोलीस कर्मचारी गट, १० बिगारी यांच्या साह्याने करण्यात आली.

   झोन४ च्या वतीने कोरेगाव पार्क लेन न.६ व ७ साउथ मेन रोड, ढोले पाटील रोड समोर येथील एकूण ३७ ठिकाणी कारवाई करण्यात आली व एकूण ११३३० चौ.फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. सदरची कारवाई १जेसीबी, २गॅस कटर, २ब्रेकर, १मुकादम,  १४बिगारी यांच्या साह्याने करण्यात आली.