मुलाच्या पालन पोषणासाठी लाच घेणाऱ्याना अटक

922

अनिल चौधरी,पुणे,

नाशिक येथील शासन मान्यताप्राप्त त्र्यंबकराज अनाथ बालकाश्रमातील वार्डन श्रीमती आशादेवी फकीरराव अहिरराव सचिव रा. त्र्यंबकराज त्र्यंबकराज , नाशिक आणि परमदेव फकीरराव अहिराव यांना तक्रारदार यांच्या नातवाच्या पालन पोषणासाठी २८५० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांना अटक केली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी कि, यातील तक्रारदार यांचा नातू शासन मान्यताप्राप्त त्र्यंबकराज अनाथ बालकाश्रम येथे राहत असून सदर मुलाचे पालन पोषणासाठी आरोपी आशादेवी अहिरराव आणि परमदेव अहिरराव यांनी प्रती महिना ७०० रुपये प्रमाणे जुलै २०१८  ते मार्च २०१९ चे ५९५० रुपये मागितले होते. यापैकी आरोपींनी मागील ३१०० रुपये घेतल्याचे मान्य केले व राहिलेले २८५० रुपये लाच मागितली.

परंतू तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने पडताळणी केली असता त्यात तथ्य असल्याचे समजले. त्यानुसार एसीबीने त्र्यंबकराज बालकाश्रम येथे सापळा लावला. त्यावेळी २८५० रुपयांची लाच स्वीकारताना श्रीमती आशादेवी फकीरराव अहिरराव सचिव रा. त्र्यंबकराज त्र्यंबकराज , नाशिक आणि परमदेव फकीरराव अहिराव यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाचे पोलीस अधिक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली.     

 कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी केल्यास १०६४ या टोल फ्री नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.