Thursday, July 10, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेएशियन आय हॉस्पीटलमध्ये विवाह दृष्टी भेट योजनेत 200 उपवर मुलींच्या डोळ्यावर यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया

एशियन आय हॉस्पीटलमध्ये विवाह दृष्टी भेट योजनेत 200 उपवर मुलींच्या डोळ्यावर यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया

अनिल चौधरी,पुणे  सध्याच्या जगात जाड भिंगाचा चष्मा असलेल्या मुलींची लग्न जमवताना प्रचंड अडथळे येतात. चष्मा असेलेल्या मुलींना नकार मिळतो यावर उपाय म्हणून पुण्यातील जगप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया यांनी त्यांच्या एशियनआय हॉस्पीटल मध्ये विवाह दृष्टी भेट योजना  सुरु केलीय. लेसिक लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून तब्बल 200 उपवर मुलींच्या डोळ्यावर यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. 

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात पुण्यातील युवकयुवतींनी चांगला प्रतिसाद दिला. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगर मधील साई सूर्य नेत्र सेवा चे संचालकप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सौ. सुधा कांकरिया, व एशियन आय हॉस्पीटलच्या संचालिका डॉ. श्रुतिका कांकरिया उपस्थित होते. यावेळी बोलताना सौ. मुक्ता टिळक यांनी एशियन आय हॉस्पीटलच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या“लग्न जमवताना एखाद्या मुलीला दृष्टी दोष असेल तर अडथळे येतात. त्यावर उपाय म्हणून या हॉस्पीटलमध्ये सुरु असलेली विवाह दृष्टी भेट योजना खूपच चांगली असून तब्बल  ३२००० उपवर मुलींचा दृष्टी दोष काढून त्यांची लग्न जमली. ही खरोखरचकौतुकाची बाब आहे. एक प्रकारचा हा एक वेगळा सामाजिक उपक्रम आहे.”  गेल्या २५ वर्षापासून कांकरिया परिवार पुणे आणि नगर तसेच राज्यातील नेत्र रुग्णांची अविरत नेत्र सेवा करीत आहे त्या बद्दल सौ. टिळक यांनी कांकरिया परिवाराचे अभिनंदन केले. 

यावेळी डॉ. वर्धमान यांनी या उपक्रमांची तसेच एशियन आय हॉस्पिटल उपलब्ध असलेल्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. एशियन आय हॉस्पिटलने चष्मा काढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान व मशिनरी जर्मनीतूनआणली आहे. त्याला लेसिक लेझर व्हिजन करेक्शन नेत्र शस्त्र क्रिया म्हणतात. सुरुवातीच्या नेत्र चाचण्या पूर्ण केल्यानंतर पाच  मिनिटातच दोन्ही डोळ्यावर लेझर शस्त्र क्रिया केली जाते आणि रुग्णाची दृष्टी लगेचच स्वच्छ होते. हि शस्त्र क्रिया संपूर्ण पणेसुरक्षित आणि वेदना विरहित आहे. डोळ्याच्या पडद्याला कोणत्याही प्रकारचा छेद न देता, टाका न टाकता फक्त लेझर किरणाचा सफाईदार वापर करून रुग्णाचा दृष्टी दोष दूर केला जातो. एशिंयन आय हॉस्पिटल व साई सूर्य नेत्र सेवा गेल्या २५ वर्षापासून हीशस्त्र क्रिया करीत असून हे तंत्र ज्ञान भारतात सर्वप्रथम आम्ही आणले याचा आम्हाला  अभिमान आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!