आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली संभाव्य यादी तयार

1327

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली संभाव्य यादी तयार झाली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 7 उमेदवारांची नावं आहेत. आज आणि उद्या ही यादी जाहीर केली जाणार आहे.
भाजपच्या 7 उमेदवारांची नावं :

नागपुर -नितिन गडकरी

चंद्रपूर – हंसराज अहीर

जालना – 1रावसाहेब दानवे

पुणे – गिरीश बापट

अकोला – संजय धोत्रे

भिवंडी – कपिल पाटील

गडचिरोली – अशोक नेते

पुण्यात गिरीश बापट
राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे लोकसभेच्या जागेवर भाजप कोणाला तिकीट देणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या.अखेर भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट कापून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना तिकीट जाहीर केलं.
जालन्यात रावसाहेब दानवेच
शिवसेना-भाजपचा सर्वात मोठा तिढा असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना तिकीट निश्चित केलं आहे. इथे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता.