महिलेचा विनयभंग करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यास अटक

735

अनिल चौधरी, पुणे

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चऱ्होली येथे एक ३७ वर्षीय महिला एकटीच घरी असताना आरोपी शिवराम तुकाराम मगर वय ४८ धंदा-नोकरी, रा.आकांक्षा बिल्डींग, आळंदी याने तू मला आवडतेस असे म्हणून जबरदस्तीने घरात घुसून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली .

याबाबत अधिक माहिती देताना उपनिरीक्षक सागर म्हणाले घटनेच्या दिवशी महिला घरी एकटीच असताना आरोपी शिवराम मगर हा महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तू मला आवडतेस म्हणून जवळ ओढून तिची छाती दाबून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तिने आरडाओरडा केला असता आरोपीने तीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच काही वेळात महिलेचा मुलगा घरी आला असता त्यास देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या जवळील कटरने मारहाण करून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीवर पोलिसांनी भां.द.वि. कलम ४५२,३५४, ३२४,३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आळंदी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर करत आहेत.