नंदुरबार लोकसभेसाठी भाजपा-सेनेच्या युतीची पहिली बैठक

1200

शैलेंद्र चौधरी,नंदुरबार

नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजप सेना युतीची पहिली बैठक आज पार पडली.खासदार डॉ हिना गावित यांना भाजपकडून सेना युती कडून उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून त्या पार्श्वभूमीवर आज नंदूरबार येथील हॉटेल साई भगवती येथे युतीची बैठक संपन्न झाली त्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.

गेल्या वर्षी नंदुरबार नगरपालिकेसाठी शिवसेनेने काँग्रेस सोबत युतीने निवडणूक वाढविल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी आपली भूमिका युतीची असल्याने भाजप सेना सोबतच प्रचार व प्रसार करण्यासाठी कटिबद्ध असणार आहेत  या बैठकीत ठरविण्यात आले.तसेेेच हीना गावित याच नंदूरबार लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रसंगी डॉ हिना गावित आमदार डॉ विजयकुमार गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख आमशा पाडवी,डॉ विक्रांत मोरे,महिला आघाडी अध्यक्ष रिना पाडवी नगरसेवक चारुदत्त काळवनकर,मोहन खानवानी आदी उपस्थित होते.