भूषण गरुड पुणे
कोंढवा बुद्रुकमध्ये 3:15 पहाटेच्या सुमारास सोमजी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे व मरळ वेअर हाऊसच्या शेजारी प्लास्टिकच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत सर्व प्लास्टिक साहित्य जळून खाक झाले तसेच या आगीमुळे गोडाऊन जवळ उभे केलेली रीक्षा, टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागून जळून खाक झाल्या. सदर प्लास्टिक गोडाऊन हे तबरेज मेहबूब पठाण(वय 37) यांच्या मालकीचे होते.
कोंढवा बुद्रुक अग्नीशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि.16 मार्च रोजी 3:15 पहाटेच्या सुमारास कोंढवा बुद्रुकमध्ये सोमजी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे व मरळ वेअर हाऊसच्या शेजारी प्लास्टिक गोडाऊनला अचानक आग लागल्याची खबर मिळताच. कोंढवा बुद्रुक अग्नीशामक दलाने याची दखल घेत अग्नीशामक दलाच्या 3 गाड्या 3 टँकर तातडीने घटनास्थळी रवाना झाले. प्लास्टिक साहित्याचे गोडाऊन असल्याने प्लास्टिकने लगेच आग पकडून सर्व गोडाऊन आग लागली होती. कोंढवा बुद्रुक अग्नीशामक दलाचे तांडेल गणपत पडये, वाहन चालक योगेश जगताप, विशाल गायकवाड, सौरभ नगरे अभिजीत थाळकर, सोपान कांबळे, तेजस खरीवले, प्रदीप कोकरे यांनी प्रयत्न करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. गोडाऊनच्या बाजूला उभे केलेली रिक्षा, टेम्पो ट्रॅव्हलर आग लागून जळून खाक झाल्या. सदर घटनास्थळी मदतीला कात्रज अग्निशामक दलाच्या 2 गाड्या, कोंढवा खुर्द अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी आल्या होत्या.
या आगीचे अद्याप कारण समजू शकले नाही.