उत्पादनदन शुल्क विभागातर्फे पंधरा लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त

770

शैलेंद्र चौधरी,नंदुरबार

नाशीक विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभागाने अक्कलकुवासह जिल्ह्यात विवीध ठिकाणी 15 लाख किंमतीच्या मद्यसाठाचे 248 बॉक्स जप्त केले जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्याविक्रीवर प्रतिबंध आणण्याबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेन्यात आला.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे,निवासी उपजिल्हाधिकारी
अनिल पवार आणी उत्पादन शुक्ल विभागाचे अधिकारी मोहन वर्दे उपस्थितत होते.
लोकसभा सार्वजनिकक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी केली असून अवैध मांसची वाहतूक होणार नाही यासाठी उत्पादन शुल्क विभागामार्फत मोठया प्रमाणात मोहीम राबिवण्यात येत आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज अक्कलवासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी धाडी टाकूण अवैध मद्यसाठा जप्त केला यात पंजाब हरियाणा निर्मित अरुणाचल राज्यात
विक्रीसाठी जात असलेला अवैद्य दारुचे 248 बॉक्स जप्त करण्यात आले. त्याबरोबर दोन वाहन जप्त केले आहेत.
अवैद्य मांस वाहतुकीस आळा बसावा यासाठी राबिविण्यात आलेल्या मोहीमेत दारुबंदी निरीक्षक प्रकाश गौडा, शैलेश मराठे,अतुल शिंदे, प्र.निरीक्षक मनोज संबोधी यांनी सहभाग घेतला होता.