निवडणूक निर्णय अधिका-यांना इव्‍हीएम-व्‍हीव्‍हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण

632

  अनिल चौधरी,पुणे

 जिल्‍ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना आज इव्‍हीएम-व्‍हीव्‍हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण समन्‍वय अधिकारी डॉ. ज्‍योत्‍स्‍ना पडियार यांनी आज दिले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या या प्रशिक्षणास मावळच्‍या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुरचे रमेश काळे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते. डॉ. पडियार यांनी इलेक्‍ट्रॉनिक व्‍होटींग मशीन, कंट्रोल युनिट, व्‍हीव्‍हीपॅट यांच्‍या जोडणीचे प्रात्‍यक्षिक करुन घेतले तसेच शंकांचे निरसन केले.