कोंढव्यात इमारतीच्या टेरेस वरून उडी मारून महिलेची आत्महत्या

892

भूषण गरुड पुणे
कोंढवा खुर्द मध्ये शनिवार दि.16 मार्च सकाळी 10 सुमारास हदिया हाईट्स या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून बेबीनाझ अय्याज सिकीलगर(वय 45, रा.सर्वे नंबर 42, सवेरा पार्क,कोंढवा खुर्द)या महिलेने आत्महत्या केली. सदर महिलाही 20 वर्षापासून येरवडा मेंटल हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होती.
या प्रकरणी, कोंढवा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10 सुमारास कोंढवा खुर्द मध्ये सवेरा पार्क सोसायटी मध्ये राहत असलेल्या बेबीनाझ शिकीलगर मनोरुग्ण महिलेने परिसरातील हदिया हाइट्स इमारतीच्या टेरेसवरून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. बेबीनाझ शिकीलगर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेची माहिती कोंढवा पोलिस ठाण्याला मिळताच. पोलीस हवालदार सदाशिव गुंजले, सैफ नदाफ हे घटनास्थळी दाखल होताच. त्यांनी बेबीनाझ सिकीलगर यांचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. सदर महिलेच्या मागे पती व दोन मुले आहेत. पती रिक्षा चालवतात तर मुले शिक्षण घेऊन नोकरी करत आहे.

या प्रकरणी, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विष्णू वाडकर पुढील तपास करत आहेत.