अनिल चौधरी,पुणे
उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकीं पोलीस स्टेशन मधील सहायक पोलीस निरीक्षक(प्रभारी अधिकारी) गणपत धनसिंग जाधव ,वय ४८ वर्ष आणि जोतीराम गणपत कवठे ,वय ५२ वर्ष. सहायक पोलिस उप निरीक्षक यांना यातील तक्रारदार यांच्या पत्नीकडे 40000 हजार रुपयांची लाच मागून 2000 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी अधिक माहिती देताना म्हणाले की, तक्रारदार यांचे पत्नीचे तक्रारीवरून पो. स्टे. ढोकी येथे एक एन. सी. दाखल असून सदर एन. सी. मधील गैर अर्जदार यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी यामधील सहायक पोलीस निरीक्षक(प्रभारी अधिकारी) गणपत धनसिंग जाधव आणि जोतीराम गणपत सहायक पोलिस उप निरीक्षक यांनी 40000 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती प्रथम 2000हजार रुपये लाच देण्याचे ठरले. पण तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांच्याकडे तक्रार दाखल केली.त्यानुसार तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची पडताळणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली असता ती खरी असल्याचे सिद्ध झाले त्यानुसार उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला.यावेळी लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.