रोटरी क्लब बाणेरच्यावतीने गीत रामायण सादर

842

अनिल चौधरी, पुणे

रोटरी क्लब बाणेरच्या वतीने सासून रुग्णालयातील गर्भाशय कर्करोग उपचार विभागाच्या मदतीसाठी गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रकल्पासाठी सुमारे १० लाख रुपये प्रस्तावित आहेत. महाकवी ग.दी.माडगुळकर लिखित व स्वरतिर्थ सुधिर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतरामायणचे सादरीकरण श्रीधर फडके यांनी गणेश कला क्रीडा मंच येथे केले.या प्रसंगी रोटरी प्रांतच्या नियोजित प्रांतपाल रश्मि कुलकर्णी,पंकज शहा,रोटरी क्लब बाणेरचे अध्यक्ष रो.शेखर शेठ,कन्व्हेनर गंगाधर जोशी,कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुकन्या जोशी आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी,सदस्य व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.या वेळी बोलताना रश्मि कुलकर्णी यांनी फक्त गर्भाशय कर्क रोगासच लस उपलब्ध आहे. व ते लसीकरण आवश्यक आहे असे संगितले.गंगाधर जोशी यांनी प्रकल्पाची माहिती सांगितली.शेखर शेठ यांनी हा प्रकल्प समाजोपयोगी असल्याचे संगितले.या कार्यक्रमात चिरतरुण असे महाकाव्य गीतरामायण आपल्या मधुर स्वरात श्रीधर फडके यांनी सादर केले. व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.