शेतकऱ्याकडून लाच घेताना महिला तलाठयास रंगेहात पकडले

1135

अनिल चौधरी , पुणे

सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील घोलप नगर येथे असलेले तलाठी कार्यालयातील महिला तलाठी मीरा गोरोबा नागठीलक, वय 32 वर्षे, तलाठी-हीसरे, वर्ग-३, रा .करमाळा, सोलापूर आणि खाजगी इसम अर्जुन भगवान भोगे, वय: 65 वर्षे, , रा.करमाळा, सोलापूर यांना शेतकऱ्या कडून 5000 रुपयांची लाच घेताना तलाठी कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आले.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी अधिक माहिती देताना म्हणाले की, तक्रारदार हे 40 वर्षांचे शेतकरी आहे. तक्रारदार शेतकरी यांच्या नावावर असलेले शेतीचे क्षेत्र खरेदी दस्त नोंदणीचे संदर्भात तलाठी मौजे-हीसरे यांच्याकडे असलेल्या दस्त नोंदणी कार्यालयात आले होते. पण त्यांचे हे काम करून देण्यासाठी महिला तलाठी मीरा नागठीलक यांनी एका खाजगी व्यक्ती अर्जुन भगवान भोगे यांच्या मार्फत 5000/- रूपये लाचेची मागणी केली. लाच दिल्याशिवाय आपले काम होणार नाही याची खात्री झाल्यावर तक्रारदार शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाकडे तक्रार दाखल केली. याबाबत सोलापूर एसीबी ने दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता ती खरी असल्याचे एसीबीला समजले.त्यानुसार सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीने करमाळा येथील तलाठी कार्यालयात सापळा लावला.
याप्रसंगी मध्यस्त अर्जुन भगवान भोगे व महिला तलाठी मीरा गोरोबा नागठीलक यांना लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात पकडण्यात आले.