Sunday, April 27, 2025
Google search engine
HomeMalhar Newsकोंढवा ब्रूद्रुक गावाचा आदर्श सर्वानी घ्यावा: कुंभार

कोंढवा ब्रूद्रुक गावाचा आदर्श सर्वानी घ्यावा: कुंभार

एक गाव एक शिवजयंती

अनिल चौधरी, पुणे
कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्त कोंढवा पोलीस स्टेशनच्या वतीने परिसरातील मंडळांची कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मीटिंग आयोजित करण्यात आली होती यावेळी कोंढवा ब्रूद्रुक गावातील 25 मंडळांनी एकत्र मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे सांगितले यावर कोंढवा ब्रूद्रुक गावाचा सर्वानी आदर्श घ्यावा असे विधान यावेळी कार्यकर्त्यांना सूचना देताना कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांनीं केले.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना कुंभार म्हणाले, निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे , त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावे. डीजे तसेच मिक्सर ला परवानगी नाही आहे . त्यामुळे डीजे कोणीही लावू नयेत. दोन स्पीकरला परवानगी आहे .डीजे लावल्यास कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यावेळी म्हणाले. कायद्याच्या चौकटीत राहून सण उत्सव साजरे करावेत. मिरवणूकीच्या वेळेस स्वयंसेवकांची नेमणूक करावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

याप्रसंगी कोंढवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रकांत निंबाळकर यांनी वाहतूक विभागाअंतर्गत येणाऱ्या वाहतुकीच्या परवांग्याच्या बाबतीत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी श्रीकांत पवार, महेश कामठे, राहुल कामठे, मयूर काटे, संभाजी कामठे,चंदन कामठे, केतन कामठे,सुखदेव कामठे ,शांतता कमिटी आणि मोहल्ला कमिटीचे गणेश शिंदे, सलीम शेख, सत्तार शेख तसेच कोंढवा पोलीस स्टेशनचे कर्मचारी कुमार गायकवाड, आंनद धनगर, राहुल माने आदी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!