रायगड जिल्ह्यात जनजागृती ग्राहक मंचातर्फे ठिकाणी जागतिक ग्राहक दिन साजरा

782
गिरीश भोपी, रायगड 
कोकणातील सर्वात मोठी ग्राहक संस्था असा नावलौकिक असलेल्या जनजागृती ग्राहक मंचातर्फे १५ मार्च या जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध ग्राहक उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
अलिबाग शाखेतर्फे पुरुषोत्तम गोखले यांनी ग्राहक दिन व ग्राहकांचे अधिकार या विषयी सविस्तर माहिती दिली तर जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाचे अधिकारी श्री चौरे साहेब श्री रेड्डी साहेब व सौ विजेकर मॅडम यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या विषयावर व महिला बाल विकास योजनांची सविस्तर माहिती दिली.
पेण शाखेतर्फे पेण गांधी वाचनालय येथे ग्राहकांना त्यांचे हक्क समजावून सांगण्यात आले. यात पेण शाखेचे अध्यक्ष चंद्रशेखर मेहेर, सचिव बामणे, गणेश जोशी ,बांदिवडेकर ,श्री कलमकर यांचा समावेश होता.
पनवेल शाखेतर्फे शाखेच्या कार्यालयात ग्राहक संरक्षण कायद्याविषयी जिल्हा उपाध्यक्ष बीपी म्हात्रे सर व पनवेल शाखा अध्यक्ष जाधव सर यांनी सविस्तर माहिती दिली .
खोपोली शाखेतर्फे तालुकाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा सचिव नितीन पाटील यांनी केएमसी महाविद्यालयात ग्राहक कायदा हक्क व जबाबदाऱ्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
उरण शाखेतर्फे शाखा अध्यक्ष महेश पाटील सचिव निशिकांत घरत ,अनिल महाले ,नंदकुमार पाटील यांनी विस्कळीत वाहतूक व्यवस्था व ग्राहक हक्क याविषयी उरणच्या नागरिकांना सविस्तर माहिती दिली.
रसायनी शाखेतर्फे जिल्हा उपाध्यक्ष सुनील वैद्य व पदाधिकाऱ्यांनी रसायनी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक हर्षवर्धन फसवे यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक दिन उत्साहात साजरा केला व ग्राहक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले .
कर्जत शाखेतर्फे अध्यक्ष पंढरीनाथ चित्ते व वसवले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक दिनाचे महत्त्व ,ग्राहकांचे अधिकार या विषयी माहिती देण्यात आली .
रोहा शाखेतर्फे अध्यक्ष विलास डाके जितेंद्र जाधव गांजरे यांनी ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले होते .
अशा प्रकारे रायगड जिल्ह्यात आहात प्रत्येक तालुक्यात ग्राहक दिन उत्साहात साजरा झाला असून कुठेही ग्राहकांची फसवणूक झाल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष मंगेश माळी व जिल्हा सचिव श्री नितीन पाटील यांनी केले आमचा पत्ता सुयोग अलिबाग कन्या शाळे समोर दातार निवास असा आहे.