अनिल चौधरी, पुणे
लग्नापूर्वी असलेले प्रेमप्रकरणातून विवाहित महिलेचे फोटो व प्रेमपत्रे समाजात दाखवून बदनामीची धमकी देणाऱ्या तुषार शिंदे याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात भा.द.वि ३५४ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना चाकण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक म्हणाले आरोपी शिंदे व फिर्यादी महिला एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यांत प्रेम संबंध होते. परंतु यातील आरोपी तुषार शिंदे याने सन २००८ मध्ये फिर्यादी महिलेबरोबर लग्न करण्यास नकार दिला .त्यामुळे संबंधित महिलेने त्याच्याशी मैत्री तोडून आपल्या जवळच्या नात्यातील आत्याच्या मुलाबरोबर लग्न केले. त्यानंतर आरोपीने २०१४ मध्ये महिलेचा मोबाईल नंबर मिळविला व फोन करून त्रास देऊ लागला. १६ मार्च २०१९ रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास आरोपीने त्याच्या मोबाईल वरून महिलेला फोन करून मी चाकणला येत आहे, तू मला लॉज वर भेटायला ये, नाही आली तर तुझे आणि माझे असलेले फोटो आणि जुनी प्रेमपत्रे समाजात दाखवून तुझी बदनामी करेल असे बोलून महिलेच्या मनास लज्जा निर्माण असे कृत्य केल्यामुळे महिलेने चाकण पोलीस ठाण्यात आरोपी तुषार शिंदे च्या विरोधात भां.द.वि ३५४(ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.