रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात मिडीया सेंटर

923

गिरीश भोपी ,रायगड 

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर राजस्व सभागृहासमोरच्या कक्षात माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्ष ( मिडीया सेंटर) सुरु करण्यात आले असून आज विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील यांनी या कक्षाची पाहणी केली त्याचप्रमाणे सुचना दिल्या. या संपर्क कार्यालयाचे क्रमांक व ईमेल लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

या कक्षातून माध्यमांना नियमित स्वरूपात ब्रीफिंग व्हावी तसेच निवडणूक विषयक माहिती व्यवस्थित मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या सेंटरमध्ये मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, सोशल मिडीया यांवर पेड न्यूज व जाहिरातींच्या अनुषंगाने लक्ष ठेवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे माध्यम प्रमाणीकरण काम देखील याठीकानाहून सुरु होईल. जिल्हा माहिती कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिलेले कर्मचारी हे काम करणार आहेत अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. याठिकाणी दूरदर्शन संच, संगणक, प्रिंटर, स्कॅनर्स, दूरध्वनी आदींची उपलब्धता असेल.

जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत नोटिफिकेशन जरी झाल्यानंतर नियमितरीत्या याठीकाणाहून ब्रीफिंग होईल तसेच आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या पत्रकार परिषदा देखील होतील अशी माहिती अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी यावेळी दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे , जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची उपस्थिती होती.