झी युवा वाहिनीवरील ‘वर्तुळाची शंभरी’

1362

अनिल चौधरी, पुणे    

‘झी युवा’ ही मराठी वाहिनी, प्रेक्षकांसाठी नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या मालिका घेऊन येते.  या संकल्पना प्रेक्षकांना पसंत पडतात आणि मालिका लोकप्रिय होतात. २०१८च्या डिसेंबर महिन्यात सुरु झालेली ‘वर्तुळ’ ही मालिका यापैकीचएक आहे. कुठल्याही मालिकेचे शंभर भाग पूर्ण होणे, ही मालिकेच्या यशाची पहिली मोठी पायरी असते. नुकताच  ‘वर्तुळ’ या मालिकेने हा टप्पा पूर्ण केला आहे. एक अत्यंत वेगळ्या प्रकारचे कथानक असल्याने ही मालिका प्रेक्षकांच्यापसंतीस पडली. मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले जुई, विकास आणि विजय यांनी आपल्या भूमिका योग्य प्रकारे निभावल्या आहेत. मालिकेच्या या यशात या तिघा कलाकारांचा महत्वाचा वाटा आहे. परंतु कुठलीही मालिका यशस्वीहोण्यामध्ये पडद्यामागच्या कलाकारांचाही मोलाचा वाटा असतो. त्यांची मेहनत दुर्लक्षित करून चालत नाही. म्हणूनच ‘वर्तुळ’ मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत असताना, सगळ्याच टीमला त्यात सहभागी करूनघेण्यात आलं. मालिकेच्या संपूर्ण टीमने केक कापून हा आनंद आनंद साजरा केला. वर्तूळ ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ९ वाजता झी युवावर पाहायला मिळते. . झी युवा वाहिनीवरील सर्व कार्यक्रम बघत राहण्यासाठी ३९रुपयांचा ‘ झी फैमिली पॅक’   नक्की निवडा…या मध्ये तुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील.मालिकेच्या या यशाबद्दल बोलताना, मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी म्हणते;”मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्याचा खूप आनंद आहे. कथानक वेगळ्या प्रकारचे असल्याने, सुरुवातीला मनात काहीशी धास्तीभीती होती. पण, प्रेक्षकांना मालिका आवडते आहे. त्यांचे प्रेम असेच कायम राहील याची खात्री वाटते. मालिकेवर भरभरून प्रेम करत असलेल्या प्रेक्षकांचे मी विशेष आभार मानते. कोणत्याही मालिकेच्या यशात, पडद्यामागे असणाऱ्या कलाकारांचाहीखूप मोठा वाटा असतो. त्यामुळेच मालिकेच्या यशात तेही सामान भागीदार असतात. म्हणूनच यश साजरं करत असतांना, त्यांनाही सहभागी करून घेणं फार गरजेचं होतं.  केक कापण्यासाठी, संपूर्ण टीम उपस्थित असणं हा त्याचाच एकभाग होता.”