गोकुळ नगरमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग; निलगिरीचे 20 झाडे जळून खाक

1119

भूषण गरूड
कोंढवा गोकुळ नगर मध्ये दुपारी 1.00 सुमारास कात्रज कोंढवा रोड, डॉमिनोज पिझ्झा शेजारी असलेल्या भंगार गोडाऊनला लागलेल्या आगीत सर्व भंगार जळून खाक झाले. तसेच गोडाऊनच्या जागेत असलेली 20 निलगिरीची झाडे जळून खाक झाली. आगीच्या झळीमध्ये काहि निलगिरीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 5 हजार स्क्वेअर फूटाच्या मोकळ्या जागेत सदर विनीद स्क्राप सेंटर गोडाऊन हे नितीन कांबळे(वय 38, रा.गोकुळ नगर, कोंढवा) भाडेतत्वावर चालवत आहेत.

कोंढवा बुद्रुक अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दि.22 मार्च रोजी दुपारी 1.00 सुमारास कोंढवा गोकुळ नगर, कात्रज कोंढवा रोड, डॉमिनोज पिझ्झा शेजारी असलेल्या भंगार गोडाऊनला आग लागल्याची वर्दी मिळताच. कोंढवा बुद्रुक आग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या.

कोंढवा बुद्रुक अग्निशामक दलाचे वाहन चालक – सत्यम चौखंडे, फायरमन – अजित शिंदे, विशाल यादव, देवदूत आपत्ती, आकाश पवार, सौरभ नगरे तसेच सदर घटनास्थळी मदतीला कात्रज अग्निशामक दलाच्या 2 गाड्या आल्या. कात्रज अग्निशामक दलाचे तांडेल – जयवंत तळेकर, वाहनचालक – मालुसरे, अनंत जागडे, फायरमन – जयेश लबडे, शिवदास खुटवड, संदीप गडसी वाघमोडे,तागूंदे यांनी अथक प्रयत्नातून अर्ध्या तासाच्या आत आग आटोक्यात आणून आग विझवली. आगीमध्ये जुने टायर, प्लास्टिक, पत्रे, निलगिरीची 20 झाडे, भंगार साहित्य जळून खाक झाले. तसेच या आगीची झळ बसून काही निलगिरीच्या झाडांचे नुसकान मोठ्या प्रमाणात झाले.
घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सदर आगीचे अद्यापही कारण मिळू शकले नाही.सदर याप्रकरणीचा,  कोंढवा बुद्रुक पोलीस चौकी पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, भीमराव मांजरे पुढील तपास करत आहेत.