मोहमदवाडी सर्वे २४ मधील २५ एकर १९ गुंठे जागा भैरवनाथ देवस्थान व मोहम्मदवाडी ग्रामस्थांची

1230

अनिल चौधरी, पुणे 

मोहमदवाडी सर्वे २४ मधील २५ एकर १९ गुंठे जागा भैरवनाथ देवस्थान व मोहम्मदवाडी ग्रामस्थ  सन १८६६ पासून इंग्रजांनी दिलेला इनाम वर्ग ३ ने देवस्थानला दिवाबत्तीसाठी दिलेली जागा होती . रामा तेलीला  देवस्थांच्यावतीने तेल घालण्यासाठी व्यवस्थापकाचे काम दिले होते . त्यानंतर गंगाराम घुले याना नेमन्यात आले . गंगाराम घुलेंना एकच मुलगी होती . त्या मुलीचा  जगदाळे कुटुंबियांमध्ये  विवाह झाला .  त्यांना एक मुलगा झाला  घुलेंच्या बाजून दिवाबत्तीसाठी व्यवस्थापक निवृत्ती जगदाळे यांना काम देण्यात आले . या जमिनीवर सन  २००३ ला ट्रस्ट नेमले . जगदाळे व बिल्डर  बेकायदेशीर व्यवहारामुळे व ग्रामस्थांना कधीही विचारात न घेता बेकायदेशीर व्यवहार बांधकाम व्यवसायिकाशी संगनमत करून जागेशी विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला . देवस्थान जमिनीचा सातबारा वैयक्तिक जगदाळे यांच्या नावाने करण्यात आला . त्यानंतर वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रकाशित झाल्यानंतर ग्रामस्थांना माहिती पडले . पुढे ग्रामस्थांच्यावतीने समिती नवीन गठीत करण्यात आली . बचाव समिती व ग्रामस्थांच्यावतीने प्रयत्न करण्यात आला . धर्मादाय आयुक्तांकडे बचाव समितीने दाद मागितली . त्या संदर्भात या जमिनीचा गैरव्यवहार चालला आहे . त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी या जागेला स्थगिती दिली . पुढे हे प्रकरण प्रांताकडे दाखल झाले . प्रातांनी बचाव समिती व ग्रामस्थांच्याबाजूने निर्णय दिला .

व्यवस्थापक हा मालक होत नाही . देवस्थानच्या जमिनीला  कुळ कायदा लागत नाही . इनाम वर्ग ३ च्या जमिनीला कुळ लागत नाही . या बाबी लक्षात घेउन प्रातांनी विचारपूर्वक निर्णय दिला .

भैरवनाथ देवस्थान  बचाव समिती व मोहंमदवाडी ग्रामस्थ म्हणून कैलास आबा घुले तानाजी आनंदराव घुले नारायण विठ्ठल घुले उत्तम लक्ष्मण घुले सुभाष ज्ञानोबा घुले बाळासाहेब रामचंद्र घुले दत्तात्रय ज्ञानोबा घुले दत्तात्रय नारायण घुले अंकुश आनंदराव घुले दशरथ चंद्रकांत घुले विजय गोपाळ आल्हाट भगवान दगडू घुले ,आदींनी विशेष परिश्रम घेतले . यासाठी राजेंद्र भिंताडे संजय बबन घुले मनोज बाळासाहेब घुले ,राजेंद्र मारुती घुले नवनाथ घुले व नानासाहेब भगवान घुले आदींनी विशेष सहकार्य केले .

प्रांताधिकारी ज्योती कदम यांना  बचाव समितीच्यावतीने ग्रामस्थांच्यावतीने पुष्पगुछ देउन जाहीर आभार मानण्यात आले. यापुढे बेकादेशीर रित्या व्यवहार केला तर बचाव समिती व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन व उपोषण करण्यात येईल . या जागेमध्ये बेकादेशीर पध्दतीने वाहनतळांसाठी होणारा  वापर बंद करण्यात यावा . अशी मागणी करण्यात आली आहे.